Tuesday, August 2, 2011

a marathi poem

रिपरिप येतो मनि   तरंगतो   आनंदाचे   गाणे
रंग   येऊन  पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
बालपणाच्या आठवणी   घेऊन तो येतो
पाण्यातल्या   होड्या नि गाणि तो गातो
वारा पण   अलगद डोलु  लागतो
हिरवा  निसर्ग  सारा  ओलागार होतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
मित्र  तो , सखा तो , हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा  स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित  बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो  आपला नाच करतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस  आला .
राहुल  पाठक

No comments:

Post a Comment